Breaking News

North East United ने राखला डुरंड कप! DHFC फायनलमध्ये 6-1 ने पराभूत

north east united fc
Photo Courtesy: X

North East United Won Durand Cup 2025: जगातील तिसरी आणि भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (23 ऑगस्ट) खेळला गेला. कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत असलेल्या डायमंड हार्बर फुटबॉल क्लबला 6-1 असे हरवत ट्रॉफी जिंकली. नॉर्थ ईस्ट सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरले.

North East United FC Won Durand Cup 2025

शिलॉंग लाजॉंगला पराभूत करून नॉर्थ ईस्ट सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामना खेळण्यासाठी उतरले होते. तर, प्रथमच ही स्पर्धा खेळत असलेल्या डायमंड हार्बरने विजेतेपदाचे दावेदार असलेल्या ईस्ट बंगालला मात दिलेली. त्यामुळे हा अंतिम सामना अटीतटीचा होईल अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, पहिल्याच हाफमध्ये पार्थिब गोगोई व अशीर अख्तर यांनी गोल करत नॉर्थ ईस्टला आघाडीवर पोहोचवले.

दुसऱ्या हाफमध्ये नॉर्थ ईस्टने आणखीनच आक्रमण करत शेवटच्या मिनिटापर्यंत चार गोल मारले. दरम्यान डायमंड हार्बर केवळ एक गोल करू शकले. यासह त्यांनी आपले विजेतेपद राखण्यात यश मिळवले. ईस्ट बंगालने 1990-1991 मध्ये अखेरच्या वेळी विजेतेपद राखलेले.