Breaking News

Hitomi Obara Death: ऑलिंपिक सुवर्ण विजेत्या कुस्तीपटूचे निधन, 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

hitomi obara
Photo Courtesy: X

Hitomi Obara Death: जपानची माजी कुस्तीपटू हितोमी ओबारा हिचे निधन झाले. ती 44 वर्षांची होती. तिच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हितोमी हिने जपानसाठी 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

Japanese Wrestler Hitomi Obara Passed Away

जपानच्या संरक्षण दलात कार्यरत झाल्यानंतर हितोमी हिने कुस्तीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, 2008 बिजिंग ऑलिंपिकसाठी पात्र न ठरल्याने तिने निवृत्ती घेतली. दोन वर्षांनी तिने आपला निर्णय बदलत पुनरागमन केले. लंडन येथे झालेल्या 2012 ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात तिला यश आलेले. यानंतर तिने पुन्हा एकदा निवृत्ती घेत प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. तत्पूर्वी, ती 48 किलो वजने गटात आठ वेळा जागतिक सुवर्ण विजेती ठरलेली. सध्या ती जपानच्या महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून कार्यरत होती.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द