Breaking News

आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

pkl 12
Photo Courtesy: X

PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत गाऊन स्पर्धेची सुरुवात करेल. स्पर्धेतील पहिला लेग विझाग येथे खेळला जाईल. 

PKL 12 Aka Pro Kabaddi 2025 Starts Tonight

प्रो कबड्डीच्या नव्या हंगामात अनेक नवे बदल पाहायला मिळणार आहेत. यावेळी सामन्यांची संख्या कमी केली गेली असून, प्ले ऑफ्स सामन्यांच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. तसेच, यावेळी केवळ चार शहरांमध्ये सामने खेळले जातील. त्यामुळे ही स्पर्धा खरे अर्थाने नाविन्यपूर्ण ठरेल.

स्पर्धेचा पहिला लेग विझाग येथे खेळला जाईल. उद्घाटनाच्या सामन्यात दक्षिण भारतातील दोन संघ तेलुगू टायटन्स व तमिल थलायवाज मैदानात उतरणार आहेत. या सामन्यानंतर बेंगलुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटण असा सामना होईल. पहिल्या दिवशी युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा राष्ट्रगीताचे गायन करेल.

गतविजेता हरियाणा स्टिलर्स यावेळी देखील विजेतेपदाचा दावेदार असेल. जयपुर पिंक पँथर्स, पुणेरी पलटण व पटणा पायरेट्स यांच्यावर विशेष नजर असणार आहे. दिग्गज परदीप नरवाल (Pardeep Narwal) व राहुल चौधरी यांच्याविना होणारा हा पहिलाच हंगाम असेल. या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धात्मक कबड्डीमधून निवृत्ती घेतली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Pro Kabaddi 2025 चे टाइमटेबल आले! सदर्न डर्बीने होणार सुरूवात