
Purandar Kesari 2025: पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ व पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुरंदर केसरी 2025 (Purandar Kesari 2025) स्पर्धा सोमवारी (3 मार्च) समाप्त झाली. आंबेगावच्या यश वासवंड (Yash Vasvand) याने पिसर्वेच्या प्रसाद जगदाळे (Prasad Jagdale) याला पराभूत करत ही मानाची गदा पटकावली.
(Yash Vasvand Purandar Kesari 2025)
सलग 18 व्या वर्षी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन भैरवनाथ कुस्ती स्टेडियम सासवड येथे करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 10 विविध वजनी गटातील कुस्तीपटू सामील झाले होते. खुल्या गटातील अंतिम सामन्यात काका पवार तालमीच्या यश वासवंड याच्या समोर सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी पोहोचलेल्या प्रसाद जगदाळे याचे आव्हान होते. जवळपास एक तास चाललेल्या कुस्तीत दोन्ही पैलवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. अखेर उंची व ताकदीने सरस असलेल्या यश याने विजय संपादन केला. त्याला मानाच्या चांदीच्या गदेने सन्मानित केले गेले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
या अंतिम सामन्यासाठी पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काका पवार व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
(Yash Vasvand Purandar Kesari 2025)
Story Of Padmakar Shivalkar: 589 विकेट घेऊनही पद्माकर शिवलकर अखेरपर्यंत वाटच पाहत राहिले
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।