Breaking News

बर्थडे स्पेशल! जेव्हा Miss India च्या सौंदर्याची जादू Rahul Dravid वर चालली नव्हती, काय होता किस्सा ?

RAHUL DRAVID
Photo Courtesy: X

Rahul Dravid Tempered On Miss India World: भारतीय क्रिकेटमधील ‘दिग्गज’ ही उपाधी खरंच ज्याच्या नावापुढे शोभून दिसते त्या ‘जेंटलमन’ राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा आज वाढदिवस. आधी खेळाडू मग कोच म्हणून आणि त्यापेक्षा जास्त माणूस बरच काही मिळवलेला द्रविड 52 व्या वर्षात पदार्पण करतोय. त्यानिमित्ताने त्याचा मैदानाबाहेर गाजलेला सर्वात चर्चित किस्सा आपण जाणून घेऊ.

(Rahul Dravid Sayali Bhagat Prank Story)

राहुल द्रविडने त्याची कारकीर्द सुरू केली तेव्हापासून मुलींमध्ये कमालीचा प्रसिद्ध होता. त्याच्या फीमेल फॅन्सची संख्या इतर खेळाडूंच्या मानाने अधिक होती. एखाद्या चॉकलेट हिरोसारखा द्रविड दिसायचा. मुलींमध्ये इतका प्रसिद्ध असूनही, कोणत्याही अभिनेत्री किंवा इतर कोणत्याही मुलीसोबत त्याचे नाव कधी जोडले गेले नाही. मैदानावर तो जितका जंटलमन होता, तितकाच मैदानाबाहेरही होता. आणि हे त्याने स्वतः सिद्ध करून दाखवले.

भारतात 1998-1999 मध्ये नव्यानेच हिडन कॅमेरे आले होते. ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात या कॅमेर्‍यांचा चांगलाच वापर होऊ लागलेला. याच कॅमेऱ्याची कृपा की, भारतात घडलेलं मोठं मॅच फिक्सिंग स्कॅंडल बाहेर आलं. बॉलीवूड तर या कॅमेऱ्यांमूळे पूर्णपणे उघड पडल. याचाच फायदा घ्यायचा निर्णय घेतला एम टीव्हीने. मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना अशा छुप्या कॅमेऱ्यांमध्ये कैद करून, त्यांच्यावर प्रॅंक करण्याची सिरीज त्यांनी सुरू केली. कॉमेडियन सायरस ब्रोचा त्याचा होस्ट होता. त्यांनी या सिरीजला नाव दिलं ‘एमटीव्ही बकरा’. यात राहुल द्रविडला बकरा बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

द्रविडची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्यांनी बोलावली मराठमोळी पण मिस इंडिया वर्ल्ड जिंकलेली ललना सायली भगत (Sayali Bhagat). जवळपास सगळ्याच नाईंटीज किड्सना सायली भगत कोण? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सौंदर्य आणि बोल्डनेस यांचं कॉम्बिनेशन असलेली सायली मिस इंडिया वर्ल्ड बनलेली. सुपरमॉडेल सायलीला अनेकांनी ‘वो अजनबी’ गाण्यावर थिरकताना पाहिले असेलच.

हे देखील वाचा- … आज सफल झाली सेवा!!!

एमटीव्हीने तिला सिंगापूरच्या चॅनलची रिपोर्टर बनवून द्रविडचा इंटरव्यू घ्यायला पाठवले. इंटरव्यू रूममध्ये आधीच छुपा कॅमेरा सेट केला गेलेला. सायलीने आपल्या कॅमेरामनच्या सोबतीने तो फेक इंटरव्यू सुरू केला. थोडा वेळ इंटरव्यू झाल्यानंतर तिने कॅमेरामनला बाहेर जायला सांगितले. इथून पुढे द्रविडला बकरा बनवायला त्यांनी सुरू केले. सायली इकडच्या तिकडच्या गप्पा मारत द्रविडच्या जवळ येऊ लागली. द्रविड तिच्यापासून थोडासा दूर झाला. मात्र, सायली “मी तुमची मोठी फॅन आहे, माझ्याशी लग्न करा” असे बोलू लागली. आता मात्र द्रविडचा पारा चढला आणि त्याने तिला बाजूला केलं. मोठ्याने ओरडत त्याने बाहेर असलेल्या तिच्या वडिलांना बोलावले. तिच्या वडिलांचा अभिनय करत असलेल्या त्या नटाने देखील “करा माझ्या मुलीशी लग्न” असा आग्रह सुरू केला.

द्रविडचा पारा आता चांगला चढला होता. त्याने त्या दोघांवर आगपाखड सुरू केली. मुलीला शिकण्यावर लक्ष द्यायला सांगा असतो म्हणत होता. अखेर, स्थिती हाताबाहेर जात आहे असं निदर्शनास आल्यानंतर होस्ट सायरस ब्रोचा याने येत द्रविडची समजूत काढली‌. हा प्रॅंक असल्याचे सांगितले. तरी देखील द्रविडचा राग लगेच शांत झाला नाही. थोडा वेळ बसल्यानंतर पूर्ण परिस्थिती समजावून, हे प्रकरण मिटवले गेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

मात्र, संपूर्ण प्रकरणात द्रविडने आपण खरच ‘जेंटलमन’ असल्याचे सिद्ध केले. पुढे, राहुल द्रविडने आपली मैत्रीण विजया पेंढारकर हिच्याशी विवाह केला. त्या दोघांचा प्रेमविवाह होता. द्रविड देश-विदेशात फिरत असला तरी, त्याने आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी कोणाला दिली नाही. एकीकडे नव्या पिढीतील खेळाडूंच्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना, राहुल आणि विजया 21 वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत.

(Rahul Dravid Sayali Bhagat Prank Story)