
Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने एका वर्षातच आपले पद सोडले.
Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach
राजस्थान रॉयल्सने सार्वजनिक केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल द्रविड हे मागील अनेक वर्षांपासून रॉयल्स परिवाराचा भाग आहेत. ते नेहमी राहतील. मात्र, त्यांच्याकडे सध्या असलेली जबाबदारी ते सोडत आहेत. त्यांना फ्रॅंचाईजीमध्ये आणखी मोठी भूमिका देण्याचा निर्णय घेतला गेलेला. मात्र, त्यांनी नम्रपणे त्यास नकार दिला.’
यापूर्वी खेळाडू व प्रशिक्षक म्हणून 2011 ते 2015 या कालावधीत द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्यानंतर दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ व वरिष्ठ भारतीय संघ यांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याच मार्गदर्शनास भारताने 2024 टी20 विश्वचषक उंचावला. त्यानंतर 2025 आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने त्यांना आपले मुख्य प्रशिक्षक बनवले. मात्र, संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही व नवव्या क्रमांकावर फेकला गेला.
राजस्थान रॉयल्स संघातील अनेक बदल व सध्या सुरू असलेल्या ट्रेड चर्चा यामध्ये द्रविड याची मध्यवर्ती भूमिका असल्याचे बोलले जात होते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी