Breaking News

दवंडी पिटलीये! अशा गोलंदाजांसमोर Rohit Sharma होतो टाय टाय फिस्स, आकडेवारी विचार करायला लावणारी

Rohit Sharma
Photo Courtesy: X

Rohit Sharma|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND  vs AFG) खेळला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. मागील काही काळापासून रोहित एकाच पद्धतीच्या गोलंदाजांना सातत्याने बाद होत असल्याने, त्याची दुखरी नस सर्वांना सापडल्याचे बोलले जात आहे.

रोहित शर्मा याने सुपर 8 मध्ये अफगानिस्तानविरुद्ध संघाला सावध सुरुवात दिली. तो 13 चेंडूमध्ये केवळ आठ धावा करून तो फहलहक फारूकी याच्या चेंडूवर बाद झाला. यापूर्वी युएसए विरुद्धच्या सामन्यात रोहित हा सौरभ नेत्रावळकर याच्या चेंडूवर अशाच पद्धतीने बाद झालेला. तर, पाकिस्तानविरुद्ध शाहीन आफ्रिदी याने त्याला तंबूचा रस्ता दाखवलेला. या तिन्ही गोलंदाजांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, ते सर्वजण डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज आहे.

विश्वचषकाआधी झालेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये देखील त्याची ही कमजोरी स्पष्टपणे दिसली होती. त्याला ट्रेंट बोल्ट, खलील अहमद, मोहसीन खान, टी नटराजन व अर्शदीप सिंग या गोलंदाजांनी बाद केले होते. हे सर्वजण देखील डाव्या हाताचे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे आता त्याला आपल्या या कमजोरीवर काम करावे लागेल.

आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास रोहित तब्बल 24 वेळा डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे. त्याची सरासरी 16 पेक्षा देखील कमी राहिलीये. दुसऱ्या बाजूला विराट कोहली हा देखील 14 वेळा वेगवान गोलंदाजांचा शिकार झाला आहे.

(Rohit Sharma Struggle Against Left Arm Pacers)

Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *