Breaking News

उचलून घेतले, मिठी मारली, चुंबन दिले; रोहितचं प्रेम पाहून पांड्याचे पाणावले डोळे; पाहा भावनिक Video

Rohit Sharma – Hardik Pandya Video :- भारतीय संघाने दबावाखाली शानदार पुनरागमन करत टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 11 वर्षांची प्रतीक्षा संपवली. 29 जून रोजी झालेल्या टी20 विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून ट्रॉफी जिंकली. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने अंतिम सामन्याच्या शेवटच्या चार षटकात दक्षिण आफ्रिकेला 169/8 पर्यंत रोखले.

या कडव्या लढतीच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) आणि उपकर्णधार हार्दिक पांड्यासह भारतीय खेळाडूंच्या भावना शिगेला पोहोचल्या होत्या. सर्व खेळाडूंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. चषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या ब्रॉडकास्टर्सला मुलाखत देत होता, तेव्हा एक अद्भुत क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. रोहित शर्माने हार्दिक पांड्याला मिठी मारली आणि त्याचे चुंबन घेतले. तसेच त्याने हार्दिकला सर्वांसमोर उचलून घेतले तेव्हा त्याला रडू कोसळले. आयपीएलमधील वाद विसरुन रोहित आणि हार्दिक पुन्हा एकत्र आल्याने भारतीय क्रिकेटचाहत्यांनाही त्यांचे अश्रू रोखता आले नसतील!

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

आयपीएल 2024 दरम्यान वाढले होते मतभेद
विशेष म्हणजे गेले काही महिने रोहित आणि हार्दिकसाठी बरेच वादग्रस्त ठरले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हार्दिकने रोहितच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) गुणतालिकेत तळाला राहिली. शिवाय कर्णधार बदलामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणावर नकारात्मक परिणाम होत असल्याच्या बातम्या सतत येत होत्या. त्यातही रोहित हार्दिकवर नाराज अशल्याचेही बऱ्याचदा जाणवले. परंतु आता टी20 विश्वचषक विजयामुळे हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत.

हार्दिकची संघासाठी अष्टपैलू कामगिरी
दरम्यान, हार्दिकने टी20 विश्वचषकात संघासाठी सर्वोत्तम कामगिरी केली. बॅट आणि बॉल  दोन्हीसह त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 3 षटकांत 20 धावा देत 3 अत्यंत महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या. तसेच टी20 विश्वचषक 2024 च्या हंगामात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. त्याने 8 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय बॅटनेही त्याने संघाच्या विजयात भरीव योगदान दिले आहे. फिनिशरची भूमिका निभावताना 8 सामन्यात 151 च्या स्ट्राईक रेटने त्याने 144 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

10 comments

  1. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  2. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  3. Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

  4. Lovely just what I was searching for.Thanks to the author for taking his clock time on this one.

  5. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  6. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  7. Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.

  8. Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.

  9. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  10. You actually make it seem so easy with your presentation but I find this matter to be actually something which I think I would never understand. It seems too complex and very broad for me. I’m looking forward for your next post, I’ll try to get the hang of it!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *