Breaking News

Ruturaj Gaikwad ने सोडला संघ, तडकाफडकी घेतला निर्णय, 22 जुलैला…

ruturaj gaikwad
Photo Courtesy: X

Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या इंग्लंडमध्ये यॉर्कशायर काऊंटी संघासाठी खेळणाऱ्या वैयक्तिक कारणाने उर्वरित हंगामातून माघार घेतली. महिनाभरापूर्वी ऋतुराज याने संघासोबत करार केलेला. 

Ruturaj Gaikwad Leaves Yorkshire County

जून महिन्यात ऋतुराज आणि यॉर्कशायर यांच्या दरम्यान काऊंटी चॅम्पियनशिप व वनडे कप खेळण्यासाठी करार झाला होता. तो 22 जुलै रोजी आपला पहिला सामना खेळण्याची शक्यता होती. मात्र, वैयक्तिक कारणाने त्याने आता आपण संघासाठी खेळणार नसल्याचे जाहीर केले. यॉर्कशायर काऊंटीने याबाबतचे अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. (Latest Cricket News)

ऋतुराज भारत अ संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, दोन्ही सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तत्पूर्वी, आयपीएलमध्ये देखील केवळ पाच सामने खेळल्यानंतर दुखापतीमुळे तो बाहेर झालेला. मे महिन्यापासून त्याने कोणताही प्रकारचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: क्रीडा लवादाने बदलला I League 2024-2025 चा विजेता, या संघाला मिळाले ISL चे तिकिट