Breaking News

SA20 Retention: एसए 20 2026 साठी रिटेन्शन जाहीर, खेळाडूंची झाली अदलाबदली, वाचा सविस्तर

sa20 retention
Photo Courtesy: X

SA20 Retention: क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची व्यावसायिक टी20 लीग असलेल्या एसए 20 या स्पर्धेचा चौथा हंगाम डिसेंबर-जानेवारी यादरम्यान खेळला जाईल. आगामी हंगामासाठी खेळाडूंच्या रिटेन्शनची घोषणा करण्यात आली असून, संघांमध्ये अनेक बदल झाले आहेत. अनेक मोठ्या खेळाडूंनी संघ बदलले असून, काही दिग्गज खेळाडू थेट लिलावात दिसतील.

SA20 Retention

सलग तीन वर्ष सनरायझर्स ईस्टर्न केप (Sunrisers Eastern Cape) संघाला अंतिम सामन्यात नेणारा कर्णधार ऐडन मार्करम हा या लिलावात दिसेल. तर, दक्षिण आफ्रिकेचे भविष्य मानला जाणारा डेवाल्ड ब्रेविस याला देखील लिलावाला सामोरे जावे लागणार आहे. चौथ्या हंगामासाठीचा लिलाव 9 सप्टेंबर रोजी पार पडेल. तर, स्पर्धा 26 डिसेंबर ते 25 जानेवारी या काळात होणार आहे.

निकोलस पूरन हा डर्बन सुपरजायंट्स (Durban Supergiants) संघाकडून मुक्त होत एमआय केपटाऊन (MI Cape Town) साठी खेळताना दिसेल. तर, जोस बटलर याने तीन वर्षांपासून असलेली पार्ल रॉयल्स (Paarl Royals) संघाची साथ सोडत डर्बन सुपरजायंट्सला आपलेसे केले. फाफ डू प्लेसिस हा जोहान्सबर्ग सुपर किंग्स (Jo’burg Super Kings) संघातील आपली जागा राखण्यात यशस्वी ठरला. तर, प्रिटोरिया कॅपिटल्स (Pretoria Capitals) संघाने स्पर्धेत प्रथमच सहभागी होत असलेल्या आंद्रे रसेल याला करारबद्ध केले.

एसए 20 2026 (SA20 Retention  2026) साठी रिटेन केले गेलेले खेळाडू-

एमआय केपटाऊन- कगिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, राशिद खान, कॉर्बिन बॉश, रियान रिकलटन, जॉर्ज लींडे, निकोलस पूरन

पार्ल रॉयल्स- डेव्हिड मिलर, बियॉन फॉर्चुन, लुआन डी प्रिटोरिय, सिकंदर रझा, मुजीब उर रहमान, रूबीन हरमान

डरबन सुपरजायंट्स- नूर अहमद, सुनील नरीन, जोस बटलर, हेन्रिक क्लासेन

जोहान्सबर्ग सुपर किंग्स- फाफ डू प्लेसिस, अकिल होसेन, जेम्स विन्स, रिचर्ड ग्लेसन, डोनावन फरेरा

सनरायझर्स ईस्टर्न केप- मार्को यान्सन, ट्रिस्टन स्टब्स, जॉनी बेअरस्टो, ऍडम मिल्ने, अलाह गझनफार

प्रिटोरिया कॅपिटल्स- आंद्रे रसेल, शेरफन रुदरफोर्ड, विल जॅक्स

 

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे, टीम इंडियाकडे सर्व प्रकारात जगज्जेते होण्याची संधी