Breaking News

टोकियोत घुमला शिवरायांचा जयघोष! Sarvesh Kushare ची वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये ऐतिहासिक उडी, WAC 2025

sarvesh kushare
Photo Courtesy: X

Sarvesh Kushare In World Athletics Championships 2025: टोकियो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी (16 सप्टेंबर) भारतासाठी उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. आपल्या कारकीर्दीतल सर्वोत्तम कामगिरी नोंदवत त्याने सहावे स्थान पटकावले. या स्पर्धेची अंतिम फेरी खेळणारा तो पहिला भारतीय ठरला होता.

Sarvesh Kushare In World Athletics Championships 2025

पात्रता फेरीत यश मिळवून सर्वेश अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. यापूर्वी कोणत्याही भारतीय उंच उडीपटूला वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळे अंतिम फेरीत उतरण्या आधीच त्याने एक ऐतिहासिक टप्पा पार केलेला. अंतिम फेरीत पहिले तीन टप्पे त्याने सहज पार केले. त्यानंतर 2.28 मीटर हा चौथा टप्पा देखील आपल्या तिसऱ्या प्रयत्नात त्याने पूर्ण केला. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. मात्र, 2.31 मीटर हा टप्पा पूर्ण करण्यास तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

सर्वेश याने 2.28 मीटर उडी मारल्यानंतर मैदानात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: World Wrestling Championship 2025 मधून भारत रिकाम्या हाताने परत, तीन वर्षांचा दुष्काळ सुरूच