Breaking News

धक्कादायक! पाकिस्तानच्या पराभवानंतर युट्युबरची गोळी मारून ह’त्या, वाचा नक्की काय घडले?

security guard killed youtuber
Photo Courtesy: X/Suryakumar Yadav

Security Guard Killed YouTuber After INDvPAK Match|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान रोमांचक सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे 9 जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय साजरा केला. मात्र, या सामन्यानंतर पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

पाकिस्तान विरुद्ध सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या षटकात 6 धावांनी विजय मिळवला. भारताने केवळ 120 धावांचा बचाव करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानचे चाहते मोठ्या प्रमाणात निराश दिसले. याच निराशेतून पाकिस्तानच्या लाहोर शहरात ह’त्या घडली. लाहोर येथे युट्युबर असलेला साद अहमद (Saad Ahmad) या पराभवानंतर पाकिस्तानातील लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत होता.

या प्रतिक्रिया घेत असताना, त्याने एका सुरक्षारक्षकाला याबाबत विचारले. मात्र, रागात असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याच्यावर गोळी झाडले. साद याला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेव्हा त्याला मृत घोषित केले गेले. त्या सुरक्षारक्षकाने आपण गोळी झाडल्याचे कबूल केले.

“तो सातत्याने माझ्यासमोर माईक घेऊन येत होता. त्याला नकार दिल्यानंतर येतो पुढे आल्यानंतर माझा राग अनावर झाला. त्यामुळे मी गोळी चालवली.” असे तो म्हणाला.

(Security Guard Killed YouTuber In Lahore After INDvPAK Match In T20 World Cup 2024)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *