Breaking News

Shubman Gill 200: वाह गिल वाह! एजबॅस्टनमध्ये इंग्लंडला दिला द्विशतकी दणका,

shubman gill 200
Photo Courtesy: X

Shubman Gill 200 In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार शुबमन गिल याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने आपला शानदार फॉर्म कायम राखत द्विशतकाला गवसणी घातली. इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा तो भारताचा केवळ तिसरा फलंदाज ठरला. 

Shubman Gill 200 In Edgbaston Test

पहिल्या दिवशीच्या नाबाद 114 धावांवरून पुढे खेळताना गिल याने पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवून दिला. आधी रवींद्र जडेजा आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर सोबत त्याने भागीदारी रचली. दुसऱ्या सत्रात त्याने आपले पहिले कसोटी द्विशतक पूर्ण केले. यामध्ये 21 चौकार व दोन षटकारांचा समावेश होता.

गिल हा इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा भारताचा तिसरा फलंदाज तर पहिला कर्णधार आहे. तसेच, तो या खेळी दरम्यान इंग्लंडमध्ये करणारा पहिला आशियाई कर्णधार देखील ठरला. तब्बल 23 वर्षानंतर भारतीय फलंदाजांनी इंग्लंडमध्ये दुहेरी शतक ठोकले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal Against England: इंग्लंडवर यशस्वीची ‘बॉस’गिरी! अवघ्या 12 इनिंगमध्ये केलय सळो की पळो