
Shubman Ridhima Rumours: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर व नुकतेच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला शुबमन गिल (Shubman Gill) हा मुलींमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. याच कारणाने त्याचे नाव अनेकदा विविध अभिनेत्रींशी जोडले जाते. आता त्याचे नाव थेट त्याच्यापेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या एका टीव्ही अभिनेत्रीशी जोडले जात आहे. मात्र या अभिनेत्रीने या सर्व अफवा असल्याचे म्हटले.
शुबमन याचे नाव सध्या ‘हमारी बहू रजनीकांत’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री रिद्धीमा पंडित (Ridhima Pandit) हिच्याशी जोडले जातेय. इतकेच नव्हे तर त्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील समोर येत आहेत. या प्रकरणावर आता रिद्धीमा हिने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली,
“मला एका पत्रकाराने फोन करून अशाच प्रकारे प्रश्न विचारला. मी शुबमनला कधी भेटलेही नाही. त्यामुळे लग्न आणि रिलेशनशिपच्या बातम्या खोट्या आहेत. आम्ही कधी भेटलो तर या गोष्टीवर प्रचंड हसू. मला माहित आहे तो खूप जास्त क्युट आहे. मात्र, तुम्ही जे काही म्हणता ते सत्य नाही.”
ब्रँड नंबर 1 विराट! कमाई इतकी की दुसरे सेलिब्रिटी जवळपासही नाहीत, पाहा पूर्ण लिस्ट
शुबमन हा यापूर्वी देखील अशा गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. अनेकदा सारा शुबमनचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येत असते. तसेच, चाहते देखील तिच्या नावाने शुबमनला चिडवताना दिसतात. अशाच प्रकारे अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिच्यासोबत देखील त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र, त्यावर साराने स्पष्टीकरण देत म्हटलेले, तुम्ही चुकीच्या साराशी बोलत आहात.
(Shubman Ridhima Rumours Of Marriage)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।