Breaking News

धक्कादायक! PKL 12 लिलावात अनसोल्ड होताच Pardeep Narwal चा कबड्डीला रामराम, उद्विग्नतेतून घेतला निर्णय

PARDEEP NARWAL
Photo Courtesy: x

Pardeep Narwal Retired From Kabaddi: भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार व प्रो कबड्डी (Pro Kabaddi) इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर परदीप नरवाल (Pardeep Narwal) त्याने अचानकपणे निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) लिलावात विकला न गेल्याने उद्विग्न होत त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Pardeep Narwal Retired From Kabaddi

प्रो कबड्डी 2025 लिलावात परदीप सहभागी झाला होता. केवळ वीस लाख रुपये बेस प्राईस असतानाही त्याच्यावर 12 पैकी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यानंतर एकाच दिवसात त्याने हा निर्णय घेतला. परदीप आंतरराष्ट्रीय कबड्डीसोबतच कोणत्याही प्रकारची व्यावसायिक कबड्डी देखील खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. निराशेतून हा निर्णय त्याने घेतला असण्याची शक्यता वर्तवली जातेय. कबड्डी समालोचक सुनील तनेजा यांनी हा निर्णय सार्वजनिक केला. परदीप प्रशिक्षक म्हणून आपली दुसरी इनिंग सुरू करू शकतो.

परदीप कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्यानंतर आशियाई स्पर्धांमध्ये दोन वेळा सुवर्णपदके त्याने जिंकली. प्रो कबड्डी इतिहासात सर्वाधिक रेडिंग पॉईंट मिळवणारा तो खेळाडू आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये 190 सामने खेळताना 1890 गुण मिळवले होते. तब्बल 88 सामन्यांमध्ये त्याने सुपर 10 मिळवण्याची अचाट कामगिरी देखील केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

परदीप प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात चर्चेत आला होता. त्याने सलग तीन हंगाम पटना पायरेट्सला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मागील काही वर्षात त्याची कामगिरी ढासळली होती. त्यामुळे या वेळी लिलावात त्याच्यावर कोणीही बोली लागली नाही.

Pardeep Narwal Retired From Kabaddi

हे देखील वाचा:

PKL 12 Auction: शादलू सलग तिसऱ्या वर्षी दोन कोटींच्या पार, पवन सेहरावतची घटली किंमत