Breaking News

WSKL 2026: कबड्डीला मिळाला ‘ग्लोबल’ मंच! क्रिकेटपेक्षा जास्त बक्षीस देऊन सुरू होतेय नवी लीग

WSKL 2026
Photo Courtesy: X

SJ Uplift Kababdi Announced WSKL 2026: भारताच्या मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. प्रो कबड्डी आणि कबड्डी वर्ल्ड कप यांच्यासारख्या स्पर्धांनंतर आणखी एक मोठी लीग लवकरच सुरू होईल. पुढील वर्षी वर्ल्ड सुपर कबड्डी लीग (WSKL 2026) ही मोठी लीग सुरू करण्याची घोषणा झाली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च या काळात दुबईत ही स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जगभरातील अनेक देशांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

WSKL 2026 Announced By SJ Uplift Kababdi

आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने होणाऱ्या या लीगमध्ये आठ संघ असतील. प्रत्येक संघात भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल. ज्यामुळे मैदानात खऱ्या अर्थाने स्पर्धा निर्माण होईल. दक्षिण कोरिया, इराण, थायलंड, मलेशिया, जपान, कॅनडा आणि अमेरिका यासारख्या देशांनी या योजनेला पाठिंबा दिला. सुमारे 20 देशांच्या संघटनांनी आपले खेळाडू या लीगसाठी पाठवण्यासाठी होकार दिला.

एसजे अपलिफ्ट कबड्डी हे या लीगची मालकी आणि संचालन करणार आहेत. भारताबाहेर कबड्डीचा विकास करण्याचा आणि कबड्डीला ऑलिंपिक खेळ बनण्यासाठी हे आयोजन करत असल्याचे, एसजे अपलिफ्ट कबड्डीचे संस्थापक संभव जैन यांनी म्हटले. ही लीग कबड्डीला आवश्यक असलेला मोठा मंच देईल. आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनच्या भक्कम पाठिंब्यासह आणि बक्षीसांच्या तब्बल 48 कोटी रुपयांच्या निधीसह ही लीग खेळाच्या भविष्यासाठी आशादायक असेल, असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: PKL 12 Auction: शादलू सलग तिसऱ्या वर्षी दोन कोटींच्या पार, पवन सेहरावतची घटली किंमत