Team India Hoping Win In Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटी (Bengaluru Test) च्या चौथ्या दिवशी भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात 462 धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान असेल. असे असले तरी, अजूनही भारतीय संघाला विजय मिळण्याची आशा आहे. यासाठी त्यांना भारतीय संघानेच 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत (IND v AUS Mumbai Test 2004) मिळवलेला विजय प्रेरणा देईल.
Team India Taking Inspiration From 2004 Mumbai Test
YEARS AGO when I was 11 years old ( 2004). I saw a test match in which India were bowled out for 104 runs , yet won the TEST MATCH inside 2 days.
We made 205 in 2nd innings and set Aus a total of 105.
Aus 91 all out. We defended 104 runs!!!! This fight reminded me of that game https://t.co/55RJaQHHEr pic.twitter.com/GgyEDxnRu9— Mangesh Surve (@Mikhandeskar) October 19, 2024
बेंगळुरू कसोटीत भारतीय संघाला आपल्या पहिल्या डावात केवळ 46 धावांमध्ये सर्वबाद व्हावे लागले. त्यानंतर न्यूझीलंडने 402 धावा करत 356 धावांची मोठी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या डावात भारतीय संघाने जबरदस्त फलंदाजी करताना सर्फराज खान याचे शतक व रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत यांच्या अर्धशतकांनी भारताला 462 अशी मोठी मजल मारून दिली. तळातील फलंदाज फारसा संघर्ष करू न शकल्याने न्यूझीलंड समोर केवळ 107 धावांचे आव्हान उभे आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघ फिरकीच्या जोरावर हे आव्हान न्यूझीलंडसाठी मोठे करण्याचा प्रयत्न करेल.
ऑस्ट्रेलिया संघ 2004 मध्ये भारत दौऱ्यावर आला असताना मुंबई येथे झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत अशीच परिस्थिती भारतीय संघासमोर होती. त्या सामन्यात भारताचा पहिला डाव केवळ 104 धावांमध्ये समाप्त झाला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव देखील 203 धावांवर संपवला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात 205 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 107 धावांचे आव्हान असताना, भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 93 धावांमध्ये संपवत एक ऐतिहासिक विजय मिळवलेला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
पाचव्या दिवशी फिरकीला मदतगार झालेल्या खेळपट्टीवर त्यावेळी अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 93 धावांवर संपवण्यात हरभजन सिंग याने सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने पाच बळी आपल्या नावे केलेले. तर, मुरली कार्तिक याने तीन बळी घेत त्याला साथ दिलेली. यानंतरही ऑस्ट्रेलिया संघाने ही मालिका 2-1 अशी आपल्या नावे केलेली.
हे देखील वाचा: Sarfaraz Khan ने अब्बूंचे पांग फेडले! वाचा बाप-लेकाची सिनेमाला लाजवणारी संघर्षगाथा
बेंगळुरू कसोटीत भारतीय संघाला विजय मिळवायचा असल्यास रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) व कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या फिरकी तिकडीला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल. तर, नवीन चेंडूने पहिल्या काही षटकात भारताला यश मिळवून देण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघ संपूर्ण दिवस पावसाची अपेक्षा देखील करू शकतो.
(Team India Taking Inspiration From 2004 India v Australia Mumbai Test Ahead Bengaluru Test Last Day)