Breaking News

जगजेत्या Team India ने घेतली पंतप्रधानांची भेट! खेळाडूंची संवाद साधताना नरेंद्र मोदी म्हणाले…

TEAM INDIA
Photo Courtesy: X

Team India Meet PM Narendra Modi: रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली.

तब्बल पाच दिवसानंतर भारतीय संघ मायदेशात दाखल झाला. पहाटे 4.30 वाजता दिल्ली येथे पोहोचल्यानंतरही चाहत्यांनी मोठ्या संख्येने जमा होत त्यांचे स्वागत केले. विमानतळ आणि हॉटेल येथे भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. यादरम्यान खेळाडूंनी आनंदाने नाचत या अभिवादनाचा स्वीकार केला. त्यानंतर खेळाडू आराम करण्यासाठी आयटीसी मोर्या हॉटेलला पोहोचले.

नियोजित कार्यक्रमानुसार, संपूर्ण संघ दहा वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचला. पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंसोबत ब्रेकफास्ट केल्यानंतर गप्पा मारल्या. त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर फोटोशूट करून भारतीय संघाने पंतप्रधानांचा निरोप घेतला.

दुपारी भारतीय संघाने मुंबईकडे प्रस्थान केले असून चार वाजण्याच्या आसपास संघ मुंबई दाखल होईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता नरिमन पॉईंट येथून भारतीय संघाच्या विजय मिरवणुकीला (Victory Parade) सुरुवात होणार आहे. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम या दोन किलोमीटरच्या अंतरावर भारतीय संघ आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करेल. त्यानंतर वानखेडे स्टेडियम येथे सन्मानाचा कार्यक्रम पार पडेल. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. भारतीय खेळाडू त्यावेळी तिथे व्हिक्टरी लॅप देखील लावतील.

(Team India Meet PM Narendra Modi After T20 World Cup Win)

VIDEO: विश्वविजेती Team India भारतभूमीवर! दिल्लीकरांनी केले ढोल-नगाड्यांनी स्वागत, खेळाडूंनी धरला ताल