Breaking News

Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार

T20 World Cup 2024
Photo Courtesy: X/BBCI

Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे दोन क्रिकेटपटू मायदेशी परतणार असल्याचे वृत्त आहे.

वेस्ट इंडिजमध्ये भारताला सुपर आठ फेरीतील 3 सामने खेळायचे आहेत. मात्र भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना टी20 विश्वचषकादरम्यान भारतात परतावे लागू शकते. या दोन्ही खेळाडूंना टी20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नसले तरी ते राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघासोबत होते. माध्यमांतील वृत्तांनुसार शुभमन गिल आणि आवेश खान यांचा व्हिसा फक्त अमेरिकेपर्यंतच होता. भारतीय संघाने पहिले तीन सामने अमेरिकेत खेळले आहेत. आता भारतीय संघाला वेस्ट इंडिजच्या भूमीवर सामने खेळायचे आहे. त्यामुळे शुभमन गिल आणि आवेश खान यांना व्हिसाशी संबंधित कारणांमुळे भारतात परतावे लागू शकते, कारण या दोघांकडे वेस्ट इंडिजचा व्हिसा नाही.

भारतीय संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरला
भारतीय संघाने आपल्या टी20 विश्वचषकाच्या मोहिमेला शानदार सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला होता. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत केले. आयर्लंड आणि पाकिस्ताननंतर भारताने यजमान अमेरिकेचा पराभव केला. या सलग 3 विजयानंतर भारतीय संघ सुपर-8 फेरीत पोहोचला आहे. मात्र, भारताला 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. त्यानंतर 20 जून रोजी अफगाणिस्तान व 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ सुपर-8 फेरीत आमनेसामने येईल.

4 comments

  1. Hello there, You have done an excellent job. I will definitely digg it and personally suggest to my friends. I’m sure they will be benefited from this website.

  2. Very interesting subject, appreciate it for putting up. “Genius is of no country.” by Charles Churchill.

  3. Hey there! Do you know if they make any plugins to help with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good success. If you know of any please share. Kudos!

  4. Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *