Breaking News

ब्रॅंड ईज ब्रॅंड! Virat Kohli च्या जर्सीला मिळाली रेकॉर्डब्रेक किंमत, रोहित-धोनीच्या बॅटनाही लाखोंची बोली, समाजाच्या कल्याणासाठी…

virat kohli
Photo Courtesy: X

Virat Kohli Jersey And Gloves Sold In Cricket For A Cause: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुल (KL Rahul) व त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी शुक्रवारी (23 ऑगस्ट) मुंबई येथे एका विशेष लिलावाचे आयोजन केले होते. विप्ला फाउंडेशन (Vipla Foundation) या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी निधी गोळा करण्याकरिता हा लिलाव आयोजित केला गेला होता.‌ यामध्ये विविध क्रिकेटपटूंच्या साहित्याचा लिलाव करण्यात आला. यात भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्या जर्सीला सर्वाधिक बोली लावण्यात आली.

Virat Kohli Jersey And Gloves Sold In Cricket For A Cause

विप्ला फाउंडेशन यांच्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या या लिलावात विराट कोहली याने आपली जर्सी व ग्लोव्हज दिलेले. त्याच्या जर्सीला तब्बल 40 लाख रुपये किंमत मिळाली. तर, ग्लोव्हजला 28 लाख अशी मोठी रक्कम मिळाली.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या बॅटला 24 लाख रुपयांची बोली लागली. तर, माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्या बॅटवय 13 लाख, तर माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या बॅटवर 11 लाख रुपयांची बोली लावली गेली. यांच्यासोबतच केएल राहुलच्या जर्सीला 11 लाख व बॅटला 7 लाख रूपयांची बोली लागली. श्रेयस अय्यरच्या बॅटला 2.80 लाख रुपये मिळाले. या संपूर्ण लिलावातून मदत म्हणून 1 कोटी 93 लाख इतकी रक्कम उभी केली गेली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

आथिया शेट्टी हिच्या आजीने अनेक वर्षांपूर्वी श्रवणशक्ती व बौद्धिकदृष्ट्या काहीश्या अक्षम असलेल्या मुलांसाठी विप्ला फाउंडेशनची सुरुवात केली होती. आथिया हिने यापूर्वी म्हटले होते की, लहानपणापासून मी अनेकदा या मुलांसोबत वेळ घालवला आहे.

(KL Rahul Conducted Auction For Vipla Foundation Virat Kohli Jersey And Gloves Sold)

नुसता धुरळा! Maharaja T20 Trophy मध्ये रंगला ‘ट्रिपल सुपर-ओव्हर’ सामना, वाचा काय-काय घडल, Video पाहा