डब्लूडब्लूई (WWE) सुपरस्टार रोमन रेन्स (Roman Reign) मागील काही काळापासून रिंगपासून दूर आहे. एकावेळी रिंगचा सर्वात प्रसिद्ध खेळाडू असलेला रोमन खेळत नसल्याने डब्ल्यूडब्ल्यूई खेळाची लोकप्रियता देखील काहीशी कमी होत असल्याचे बोलले जातेय. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अचानक रोमन कुठे गायब झाला याबाबत अनेकदा चर्चा होते. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
रेसलमेनिया 40 नंतर रोमन रिंगमध्ये दिसलेला नाही. त्यावेळी कोडी रोड्सविरुद्ध तो आपली चॅम्पियनशिप हरला होता. सलग चार वर्ष कंपनीसाठी खेळल्यानंतर त्याने विश्रांती घेण्यासाठी निर्णय पूर्वीच घेतला होता. याबाबतची कल्पना त्याने मॅनेजमेंटला दिलेली. त्यानंतर तो अधून मधून आपले दर्शन देत असतो. मात्र, त्याने अद्याप कॉन्ट्रॅक्ट साइन केलेले नाही. तो सध्या विश्रांती घेत असला तरी चाहते समरस्लॅम 2023 मध्ये त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
रोमन सध्या हॉलीवुडमध्ये आपला हात आजमावत आहे. अनेक सुपरस्टारचा समावेश असलेल्या गुड फॉर्च्यून या चित्रपटात तो काम करतोय. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो. चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर तो कदाचित पुन्हा एकदा रिंगमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
रोमन याने सलग चार वर्ष कंपनीची धुरा आपल्या खांद्यावर वाहिली होती. त्याला द रॉक व स्टीव्ह ऑस्टिन यासारख्या दिगजांच्या बरोबरीचा सुपरस्टार मानले जाते. सुरुवातीच्या काळात रोमन, सेथ रोलिन्स व डीन अंब्रोज या तिघांच्या द शिल्ड या टीमने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर वेगळे झाल्यावर या तिघांनी देखील चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळवलेले.
(Why Roman Reign Took Break From WWE)