Breaking News

दुसऱ्या कसोटीआधी Yashasvi Jaiswal ला मिळाली गुड न्यूज, वाचा काय घडले?

yashasvi jaiswal
Photo Courtesy:X

Good News For Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी आनंदाची बातमी मिळाली आहे. आगामी देशांतर्गत हंगामात जयस्वाल हा पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) साठी खेळताना दिसेल. संघटनेने त्याने ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर केला आहे. 

Good News For Yashasvi Jaiswal

मे महिन्यात जयस्वाल याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहीत, इतर राज्यात खेळण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. जयस्वाल गोवा संघासाठी खेळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, काही दिवसातच त्याने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर त्याने आपला अर्ज मागे घेण्यासाठी आणखी एक पत्र लिहिले होते. ते पत्र संघटनेने आता मंजूर केल्याने, जयस्वाल आगामी हंगामात मुंबईसाठीच खेळताना दिसेल.

जयस्वाल हा वयोगट क्रिकेटपासून मुंबई संघाचा भाग आहे. त्याने 2019 मध्ये आपले प्रथमश्रेणी पदार्थ केले होते. मागील महिन्यात गोवा क्रिकेट संघाकडून त्याला कर्णधारपदाची ऑफर आल्यानंतर त्याने गोव्यासाठी खेळण्याचा विचार सुरू केला होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच