Breaking News

“मला माफ करा” Shane Watson ने जोडले RCB च्या चाहत्यांसमोर हात, 2016 आयपीएल फायनल…

shane watson
Photo Courtesy; X/ Shane Watson

Shane Watson Apologize RCB Fans|ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सध्या भारतात आहे. आयपीएलमध्ये समालोचन करण्यासोबत असतो अनेक कार्यक्रमांमध्ये दिसून येतोय.‌ नुकताच तो बंगळुरू येथील प्रेसिडेन्सी कॉलेज येथे पोहोचला होता. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या चाहत्यांची माफी मागितली.

शेन वॉटसन याने प्रेसिडेन्सी कॉलेज येथे एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. त्याने आपले नवे पुस्तक ‘विनर्स माईंड सेट’ या पुस्तका विषयी थोडे विवेचन केले. त्यानंतर तो विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसला. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. वॉटसन आयपीएल 2016 व 2017 अशी दोन वर्ष आरसीबी संघासाठी खेळला होता. त्यावेळी आरसीबीने 2016 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेली. मात्र, अंतिम फेरीत त्यांना सनरायझर्स हैदराबादने पराभूत केलेले. त्या अंतिम सामन्याविषयी बोलताना तो म्हणाला,

“मला तुम्हा सर्व आरसीबी चाहत्यांची 2016 आयपीएल फायनलसाठी माफी मागायची आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून अपेक्षा होती. मला देखील चांगली कामगिरी करायची होती. मात्र, ती माझ्या सर्वात खराब कामगिरी पैकी कामगिरी ठरली.”

संपूर्ण हंगामात आरसीबी संघ शानदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. अंतिम सामना देखील त्यांचेच घरचे मैदान असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात होता. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघाने आठ धावांनी हा सामना जिंकलेला. त्यानंतर आरसीबीला अद्याप अंतिम सामन्यात देखील पोहोचता आलेले नाही.

त्या सामन्यातील वॉटसनच्या कामगिरीकडे लक्ष दिल्यास दिसून येते की त्याने अपेक्षित कामगिरी केली नव्हती. प्रथम गोलंदाजी करताना त्याच्या चार षटकात तब्बल 61 धावा कुटल्या गेल्या होत्या. तर फलंदाज येतो नऊ चेंडूंमध्ये फक्त 11 धावांचे योगदान देऊ शकलेला. त्यानंतर 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजेते बनवण्यात त्याने सिंहाचा वाटा उचललेला.

(Shane Watson Apologised To RCB Fans For 2016 IPL Final)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *