![dinesh karthik retirement](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/dk-retirement.jpg)
Dinesh Karthik Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने शनिवारी (1 जून) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या 39 व्या वाढदिवसाच त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या जवळपास दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची ही समाप्ती झाली.
It's official 💖
Thanks
DK 🙏🏽 pic.twitter.com/NGVnxAJMQ3— DK (@DineshKarthik) June 1, 2024
आपल्या 39 व्या वाढदिवशीच त्याने सोशल मीडिया पोस्ट करत लिहिले,
‘मागील काही दिवसांपासून मला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. तुम्हाला कल्पना आहेच मात्र मी आता अधिकृतरित्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंबासाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
आपल्या या प्रवासात साथ दिलेल्या पालकांचे, पत्नी दीपिकाचे, प्रशिक्षकांचे, साथी खेळाडूंचे व चाहत्यांचे त्याने आभार मानले. यासोबतच त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला ज्यामध्ये त्याची संपूर्ण कारकीर्द छायाचित्रांच्या स्वरूपात दाखवली गेली.
कार्तिक याने भारतीय क्रिकेट संघासाठी 2004 मध्ये पहिला सामना खेळला होता. त्यानंतर तो 18 वर्ष भारतीय संघासाठी खेळला. माजी कर्णधार एमएस धोनी याच्या अनुपस्थितीत अनेक वेळा भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक म्हणून त्याने जबाबदारी सांभाळली होती. त्याने भारतीय संघासाठी 26 कसोटी सामने खेळताना 1025 धावा केल्या. त्यासोबतच 94 वनडे खेळताना 1752 धावा व 60 टी20 सामने खेळताना 686 धावा त्याने जमा केल्या. भारतीय संघाने जिंकलेल्या पहिल्या 2007 टी20 विश्वचषक व 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो सदस्य होता. काही दिवसांपूर्वी समाप्त झालेल्या आयपीएलमधून देखील त्याने निवृत्ती जाहीर केली होती.
(Dinesh Karthik Retirement| Dinesh Karthik Annouced Retirement From All Forms Of Cricket)