Breaking News

Trent Boult : “हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल”, न्यूझीलंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय

Trent Boult :- यंदाचा टी20 विश्वचषक न्यूझीलंड संघासाठी (New Zealand) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमावले असून त्यांना फक्त ‘दुबळ्या’ युंगाडांविरुद्धचा सामना जिंकता आला. संघात एकाहून एक बहाद्दर खेळाडू असतानाही न्यूझीलंडला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. दरम्यान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट (Trent Boult Last T20 World Cup) याने धक्कादायक वक्तव्य केले आहे. हा आपला अखेरचा टी20 विश्वचषक असल्याचे बोल्टने म्हटले आहे.

शनिवारी (15 जून) सकाळी न्यूझीलंडने युगांडाच्या संघाचा 9 गडी राखून पराभव केला. या स्टार किवी गोलंदाजाने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. तो म्हणाला, “हा माझ्या कारकिर्दीतील शेवटचा टी20 विश्वचषक आहे.” अशा परिस्थितीत बोल्ट 2026 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोल्टची टी20 विश्वचषक 2024 मधील कामगिरी
टी20 विश्वचषक 2024 मधील बोल्टच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने चांगली गोलंदाजी केली. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात 6.42 च्या सरासरीने आणि 3.75 च्या इकॉनॉमीने 7 विकेट्स घेतल्या आहेत. 3/16 ही त्याची सध्याच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना पापुआ न्यू गिनीशी होणार आहे. हा सामना सोमवारी (17 जून) होणार आहे.

बोल्टची टी20 विश्वचषकातील कामगिरी
बोल्टच्या टी20 विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचे तर तो आतापर्यंत 17 सामने खेळला आहे. या काळात त्याने 17 डावात 12.84 च्या सरासरीने आणि 6.07 च्या इकॉनॉमीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. 2014 मध्ये तो पहिल्यांदा टी20 विश्वचषक खेळताना दिसला होता. बोल्टच्या नावावर 60 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 81 विकेट आहेत. या काळात वेगवान गोलंदाजाची सरासरी 21.79 आणि इकॉनॉमी 7.75 होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *