Breaking News

Pat Cummins बद्दल हे काय बोलला भारताचा युवा ऑलराऊंडर? म्हणाला, “त्याने माझा खेळही पाहिला नाही…”

pat cummins
Photo Courtesy: X

Nitish Kumar Reddy On Pat Cummins: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, दुखापतीमुळे तो भारतासाठी पदार्पण करायचे राहिला. आयपीएल गाजवल्यानंतर आता त्याने एक मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचा आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचे कौतुक केले.

नितीश याने आयपीएल 2024 मध्ये आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांची मने जिंकली. खास करून फलंदाजीत संघाला गरज असताना त्याने महत्त्वाच्या आणि मोठ्या खेळ्या केल्या. कर्णधार कमिन्स याने त्याचा योग्य वापर करत संघाच्या विजयात त्याचे योगदान मिळवून दिले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितीश याने देखील कमिन्स याने कसा पाठिंबा दिला याविषयी खुलासा केला.

तो म्हणाला, “आयपीएल सुरू होण्याआधी मी सराव सत्रांमध्ये चांगला खेळत होतो. मात्र, तेव्हा कमिन्स संघासोबत जोडलेला नव्हता. तो स्पर्धेच्या तीन दिवस आधीच दाखल झाला. त्यावेळी त्याने मला म्हटले तू चांगला फलंदाज आहेस. त्यावर मी त्याला विचारणा केली की, मात्र तू माझा खेळ पाहिलाच नाहीस. तेव्हा त्याने सांगितले मी युट्युबवर पाहिले आहे‌.”

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

नितीश पुढे म्हणाला, “त्याच्या या शब्दांमुळे माझा उत्साह वाढला. संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने मला नेहमी मदत केली. नैसर्गिक खेळ करण्यावर आणि सामन्यांना सहजतेने घेण्याविषयी तो बोलायचा.”

कमिन्स याच्या नेतृत्वात हैदराबाद संघ 2018 नंतर प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला.

(Nitish Kumar Reddy Praised Pat Cummins)

“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया