
WWE WrestleMania 41: डब्ल्यूडब्ल्यूई रेसलमेनिया 41 (WWE WrestleMania 41) मध्ये पहिल्या रात्रीचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या दिवशीच्या मेन इव्हेंटमध्ये एक खळबळजनक गोष्ट पाहायला मिळाली. रोमन रेन्स (Roman Reigns), सीएम पंक (CM Punk) व सेथ रोलिन्स (Seth Rollins) यांच्यातील ट्रिपल थ्रेट सामन्यात सेथ रोलिन्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे रोमन रेन्ससोबत मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या पॉल हेमन (Paul Hayman) यांनीच यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
WWE WrestleMania 41 Paul Hayman Betrayed Roman Reigns
मेन इव्हेंटमध्ये झालेल्या या मॅचमध्ये तीनही सुपरस्टारने जोरदार खेळ केला. मात्र, शेवटी मॅच मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. थकल्यानंतर तीनही सुपरस्टार जमिनीवर पडलेले असताना पॉल हेमन यांनी पंकला चेअर ऑफर केली. मात्र, तो पाठमोरा होताच त्याला लो ब्लो देऊन पाडले. रोमन रेन्स या मूव्हनंतर आनंदी झालेला दिसला.
PAUL HEYMAN DID THE UNTHINKABLE! 😲#WrestleMania pic.twitter.com/i4t1QyDLQx
— WWE (@WWE) April 20, 2025
हेमन यांनी त्यानंतर तीच चेअर रोमनला देत सेथ रोलिन्सला मारण्यास सांगितले. परंतु, मोक्याच्या क्षणी त्याने रोमनलाही लो ब्लो देऊन पाडले. अखेर, रोलिन्सने रोमनला मारत मॅच जिंकली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
काही दिवसांपूर्वीच डब्ल्यूडब्ल्यूई रॉच्या एका भागात रोलिन्स हेमन यांना त्याच्या बाजूने येण्यासाठी सांगत होता. बेस्ट इन द वर्ल्ड व ट्रायबल चीफ यांच्या दरम्यान अडकून पडण्यापेक्षा हेमन यांनी रोलिन्सची साथ देण्याचा विचार केला असावा.
(WWE WrestleMania 41 Day 1 Main Event)
हे देखील वाचा- कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।