Breaking News

बिग ब्रेकिंग! John Cena विश्वविक्रमी 17 व्यांदा WWE जगज्जेता, WrestleMania मधून घेतली कायमची एक्जिट

john cena
Photo Courtesy: X

John Cena WWE WrestleMania 41: डब्ल्यूडब्ल्यूई रेसलमेनिया 41 (WWE WrestleMania 41) च्या दुसऱ्या दिवशी चॅम्पियनशिपच्या महत्त्वाच्या लढती खेळल्या गेल्या. डब्ल्यूडब्ल्यूई अनडिस्पुटेड चॅम्पियनशिप लढतीत जॉन सीना (John Cena) याने कोडी रोड्स याला हरवत चॅम्पियनशिप जिंकली. यासह डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासात सर्वाधिक 17 वेळा चॅम्पियनशिप जिंकण्याचा मान त्याने मिळवला.

John Cena Won WWE Undisputed Championship 17 Time

मागील वर्षी आपल्या निवृत्तीची घोषणा केलेल्या जॉन सीना याच्यासाठी हा अखेरचा सामना असू शकतो, असे बोलले जात होते. सामन्यात उतरल्यानंतर त्याने रोड्स याच्यावर वर्चस्व गाजवत सामन्यासह चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. याबरोबरच त्याने रिक फ्लेअर यांचा 16 चॅम्पियनशिपचा विक्रम मोडीत काढला. सीना या सामन्यानंतर लगेच निवृत्त होणार नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. तो मे महिन्यात बॅकलॅश सामना खेळेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(John Cena Won WWE Undisputed Championship 17 Time)

हे देखील वाचा- WWE WrestleMania 41 मध्ये रोमन रेन्ससोबत धोका! जवळच्याच व्यक्तीने केली गद्दा’री, पाहा व्हिडिओ