Breaking News

या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे, टीम इंडियाकडे सर्व प्रकारात जगज्जेते होण्याची संधी

ICC Tournaments
Photo Courtesy: X

ICC Tournaments Till 2031: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी 2031 पर्यंतच्या पुरुष आयसीसी स्पर्धांबाबत माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या तब्बल नऊ स्पर्धा यादरम्यान होतील. यापैकी तीन स्पर्धांचे यजमानपद बीसीसीआय (BCCI) अर्थातच भारताकडे असेल. 

ICC Tournaments Till 2031

आयसीसी टी20 विश्वचषक 2026 (ICC T20 World Cup 2026) या पहिल्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका करतील. त्यानंतर होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक 2027 (ICC ODI World Cup 2027) या सर्वात मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया यांच्या खांद्यावर असेल. तर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आयसीसी टी20 विश्वचषक 2028 (ICC T20 World Cup 2028) आयोजित करतील.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 (ICC Champions Trophy 2029) आयोजित करण्याची संधी पुन्हा एकदा भारताला मिळेल. तर, आयसीसी टी20 विश्वचषक 2030 (ICC T20 World Cup 2030) चे यजमानपद इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंड हे भूषवतील. यानंतर, आयसीसी वनडे विश्वचषक 2031 (ICC ODI World Cup 2031) भारत आणि बांगलादेश संयुक्तरीत्या आयोजित करतील.

याच कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तीन सायकल खेळल्या जातील. यामध्ये डब्ल्यूटीसी 2025-2027 (WTC 2025-2027), डब्ल्यूटीसी 2027-2029 व डब्ल्यूटीसी 2029-2031 यांचा समावेश असेल. त्यापैकी दोन सायकलच्या अंतिम सामन्याच्या यजमानपदासाठी बीसीसीआय आग्रही आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: या आहेत 2031 पर्यंतच्या ICC Tournaments! तिघांचे यजमानपद भारताकडे