
ENG vs IND: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. मालिकेतील तीन सामने झाले असून, यजमान इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे. भारतीय संघ पुनरागमन करत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. असे असतानाच उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात एका नव्या वेगवान गोलंदाजाचा समावेश केला गेला.
ENG vs IND Anshul Kamboj Added In Indian Squad
भारतीय संघ चौथ्या सामन्यात मँचेस्टर येथे मालिका बरोबर आणण्यासाठी उतरेल. तत्पूर्वी, सराव सत्रात दुखापतग्रस्त होऊन भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खबरदारी म्हणून भारताच्या संघात युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला निवडले गेले आहे.
नुकत्याच झालेल्या भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यावर त्याने दोन्ही सामन्यात शानदार कामगिरी केली होती. अंशुल याच्या जागी हर्षित राणा याला निवडल्याने मोठा वाद देखील निर्माण झालेला. अंशुल याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 24 प्रथमश्रेणी सामने खेळताना 79 बळी मिळवले आहेत. त्याच्या नावे एका डावात सर्व दहा बळी घेण्याचा देखील विक्रम जमा आहे. त्यासोबतच तो फलंदाजी देखील योगदान देऊ शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द