Breaking News

WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?

freedom trophy 2025
Photo Courtesy: X

Freedom Trophy 2025: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2025-2027) च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) या कसोटी मालिकेला शुक्रवारी (14 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेती असलेली दक्षिण आफ्रिका भारताला घरच्या मैदानावर आव्हान देईल. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेली विजयाची लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. 

Preview Of Freedom Trophy 2025

भारताचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी व दक्षिण आफ्रिकेतील थोर क्रांतिकारक नेल्सन मंडेला यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही मालिका खेळवली जाते. सन 2015 पासून या मालिकेला फ्रीडम ट्रॉफी अथवा गांधी-मंडेला ट्रॉफी (Gandhi-Mandela Trophy) असे संबोधण्यात येते. आतापर्यंत नजर टाकल्यास भारतीय संघाने या मालिकेवर वर्चस्व गाजवल्याचे दिसते. उभय संघांमधील मागील मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली होती. ही मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटलेली.

दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी नाणेफेकीकरिता खास नाणे वापरले जाते. त्याच्या दोन्ही बाजूला या दोन्ही महापुरुषांचे छायाचित्र असते. तसेच, विजयी संघाला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीवर देखील या महापुरुषांचे छायाचित्र कोरलेले दिसते.

सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत भारत तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. ही घरच्या मैदानावरील मालिका जिंकून पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये पोहोचण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. सध्या ऑस्ट्रेलिया व श्रीलंका पहिला दोन क्रमांकावर आहेत.

मालिका घरच्या मैदानावर होत असली तरी, भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. इंग्लंड व वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वी ठरलेला संघच मैदानात दिसेल. कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह हे पुन्हा एकदा भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरतील. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा ध्रुव जुरेल भारताच्या अंतिम 11 मध्ये सामील होतो का हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना असेल. या व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल व मोहम्मद सिराज यांची संघातील जागा निश्चित मानली जातेय.

दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका अ संघाने अनऑफिशियल सामन्यात 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करत विजय मिळवला होता. तो आत्मविश्वास वरिष्ठ संघ नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार टेंबा बवुमा, केशव महाराज, कगिसो रबाडा, ऐडन मार्करम, सायमन हार्मर व विहान मल्डर हे अनुभवी खेळाडू भारतील संघाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. दुसऱ्या बाजूला युवा कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस व ट्रिस्टन स्टब्स यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होईल.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Amol Muzumdar चा संघर्ष कबीर खानपेक्षा मोठा होता!