WPL 2026 Auction च्या मार्की खेळाडूंची आली लिस्ट, वर्ल्डकप गाजवणाऱ्या धाकड संघांच्या रडारवर

wpl 2026 auction
Photo Courtesy: X

WPL 2026 Auction Marquee Players List: आगामी वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) साठी लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. दिल्ली येथे 27 नोव्हेंबर रोजी आगामी हंगामासाठी लिलाव पार पडेल. या लिलावात 277 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यापैकी 8 खेळाडू मार्की म्हणून निवडल्या आहेत.

WPL 2026 Auction Marquee Players List

आगामी मेगा लिलावाआधी सर्व आपल्या मुख्य खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यानंतर या लिलावात जास्तीत जास्त 73 खेळाडूंवर बोली लागू शकते. त्यापैकी 23 खेळाडू विदेशी असतील. नोंदणी केलेल्या अखेरच्या खेळाडूंपैकी 194 भारतीय व 84 विदेशी खेळाडू आहेत. यापैकी चार सहयोगी देशाच्या खेळाडू असतील. खेळाडूंची सर्वोच्च बेस प्राईस ही 50 लाख असेल. तब्बल 19 खेळाडूंनी आपली बेस प्राईस 50 लाख ठेवली आहे. त्यानंतर 40 लाख व 30 लाख अशी खेळाडूंची बेस प्राईस राहिल.

मार्की खेळाडूंची यादी: लॉरा वॉल्वर्ट (Laura Wolvarrtdt), दीप्ती शर्मा, सोफी डिवाईन, सोफी एक्कलस्टोन, एलिसा हिली, एमेलिया कर, मेग लॅनिंग व रेणुका सिंग.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: परंपरा 143 वर्षांची, लढाई राखेची! कहाणी Ashes Series ची