Mitchell Starc Shine On Ashes Day 1: क्रिकेटजगतातील सर्वात प्रतिष्ठित मालिका असलेल्या ऍशेस मालिकेला शुक्रवारी (21 नोव्हेंबर) सुरुवात झाली. पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने भेदक गोलंदाजी केली. त्याने मिळवलेल्या सात बळींने इंग्लंडचा पहिला डाव केवळ 172 धावांवर संपुष्टात आला.
Mitchell Starc Shine On Perth Test Day 1
पर्थ कसोटीत नियमित कर्णधार पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्या अनुपस्थितीत उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला मिचेल स्टार्कने त्यांची कमतरता भासू दिली नाही. पहिल्या षटकातच झॅक क्राऊलीला बाद करत त्याने इंग्लंडला हादरा दिला. त्यानंतर डकेट व रूट यांना लागोपाठ बाद केले. अर्धशतकवीर हॅरी ब्रूक, कर्णधार बेन स्टोक्स व जेमी स्मिथ यांना बाद करून इंग्लंडला अडचणीत टाकले. मार्क वूडला बाद इंग्लंडचा डाव संपवला. पदार्पण करणाऱ्या ब्रेंडन डॉगेट याने दोन बळी मिळवले.
स्टार्कने 58 धावा देत 7 बळी मिळवत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. तो 21 व्या शतकात ऍशेसमध्ये एका डावात सात बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज बनला. तसेच, 1990-1991 नंतर ऍशेसच्या पहिल्या दिवशी सात बळी मिळवणारा पहिलाच गोलंदाज ठरला.
Latest Sports News In Marathi
kridacafe