Breaking News

पुन्हा क्रिकेट मेट बॉलिवूड! या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय Shreyas Iyer?

shreyas iyer
Photo Courtesy: X

Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur: भारतीय क्रिकेट संघाचा महत्वपूर्ण खेळाडू श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेनुसार तो एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय. विशेष म्हणजे ही अभिनेत्री मराठी आहे.

Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur

सोशल मीडिया व माध्यमातील बातम्यानुसार, श्रेयस हा अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) हिला डेट करतोय. श्रेयस आणि त्याची बहिण श्रेष्ठा हे नुकतेच मृणालला फॉलो करू लागलेत. या दोघांना एकत्रितपणे कधीही पाहण्यात आले नाही. मात्र, ते मित्रांच्या घरी अथवा पार्टीमध्ये भेटत असल्याचे सांगितले जातेय. दोघींनीही आपल्या नात्याबद्दल खबरदारी घेतल्याचे दिसून येते.

मृणाल ठाकूर ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती मूळची जळगावची आहे. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर कुमकुम भाग्य या मालिकेतून तिने टीव्ही श्रेत्रात पदार्पण केलेले. त्यानंतर मराठीत विटी दांडू हा चित्रपट तिने केला. टॉलिवूडमधील सीता रामम चित्रपटातून तिला विशेष ओळख मिळाली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Andre Russell चा धक्कादायक निर्णय! अचानक घेतली IPL मधून निवृत्ती,