
MS Dhoni IPL Retirement: आयपीएल 2026 (IPL 2026) च्या साखळी सामन्यांचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, या सर्व धामधुमीत भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा अद्याप एकही सामना खेळलेला नाही. परंतु आता धोनी थेट आपल्या अखेरच्या व्यावसायिक सामन्यात उतरू शकतो. या सामन्याची तारीख देखील समोर येऊ लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सला आपल्या बाराव्या सामन्यात यापूर्वी स्पर्धेतून बाहेर झालेल्या लखनऊ सुपरजायंट्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चेन्नईच्या आता केवळ अखेरचे दोन साखळी सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने प्ले ऑफ्सच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद व गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध होणार आहे. चेन्नईच्या प्ले ऑफ्सच्या आशा अंधूक झालेल्या असल्याने धोनी आपला अखेरचा सामना खेळू शकतो.
चेन्नईचा 13 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. सोमवारी 18 मे रोजी होणारा हा सामना चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानावर म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियम येथे होईल. हा चेन्नईचा आपल्या घरच्या मैदानावरील अखेरचा सामना असेल. त्यामुळे धोनी या सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे. दुखापतीमुळे धोनी या हंगामात अद्याप एकदाही मैदानात उतरला नाही.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: आता Captain Cool MS Dhoni शिवाय कोणीच नाही, भारत सरकारनेच केल शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर
kridacafe