IPL 2024, Pravin Amre On Prithvi Shaw | इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) इतिहासात एकदाही विजेतेपदाला गवसणी न घालणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2024 हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीतील 14 सामने खेळले. त्यापैकी 7 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तसेच, उर्वरित 7 सामन्यांवर त्यांना पाणी फेरावे लागले. अशात, दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. यादरम्यान कमी संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ या स्टार फलंदाजाविषयी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी मोठे विधान केले आहे. चला तर, ते काय म्हणाले जाणून घेऊयात…
प्रवीण आमरेंचं मोठं विधान
माध्यमांतील वृत्तांनुसार, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “तो आमचा रिटेन खेळाडू आहे. तुम्ही पाहू शकता, मागील चार-पाच सामन्यात त्याला बाकावर बसावे लागले. ही आयपीएल (IPL 2024) आहे. जर तुम्ही फॉर्मात नसलात, तर तुम्हाला तुमच्या जागेवर कायम ठेवले जाऊ शकत नाही. शेवटी संघावर खूप दबाव असतो. कारण, प्रत्येक सामना खूपच महत्त्वपूर्ण असतो आणि आम्हाला तो जिंकायचा असतो.”
पुढे बोलताना आमरे असे म्हणाले की, “आम्ही असं करूनही दाखवलं. पृथ्वी शॉला वगळूनही आम्ही खेळलो आणि सामनेही जिंकलो. माझ्या मते, अभिषेक पोरेलने संधी दोन्ही हातांनी पकडली आणि त्याचा चांगला फायदा घेतला.”
खरं तर, पृथ्वी शॉ दिल्ली संघाकडून पहिले दोन्ही सामने खेळू शकला नव्हता. मात्र, त्यानंतर त्याने चेन्नईविरुद्ध खेळताना 27 चेंडूत 43 धावांची वादळी खेळी केली होती. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धही 40 चेंडूत 66 धावांची खेळी साकारली होती. मात्र, या खेळीनंतर त्याचा
फॉर्म ढासळत गेला आणि त्याच्या जागी संघात सामील करून घेतलेल्या अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याने शानदार प्रदर्शन केले.
अभिषेकचा धमाका
अभिषेक पोरेलने 12 डावात 32.70 च्या सरासरीने 327 धावांचा पाऊस पाडला. त्याने दिल्लीच्या अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना 33 चेंडूत 58 धावांची वादळी खेळी साकारली होती. अभिषेकने या हंगामात दोन अर्धशतकेही झळकावली. ही दोन्ही अर्धशतके त्याने संघासाठी वरच्या फळीत फलंदाजी करताना केली. दुसरीकडे, पृथ्वी शॉ आयपीएल 2024 हंगामात फक्त 8 सामने खेळला आणि त्याच्या बॅटमधून फक्त 198 धावा निघाल्या. त्याला यादरम्यान फक्त एक अर्धशतक झळकावता आले.
हे वाचलंत का?
IPL 2024: बटलरच्या जागी उतरलेला टॉम कोहलर-कॅडमोर आहे कोण?
टीम इंडियाला मिळणार नवा कोच! विश्वचषकानंतर द्रविडचा दौर समाप्त?
विश्वचषक संघात स्थान न मिळाल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूचा मोठा निर्णय, तडकाफडकी जाहीर केली निवृत्ती
Excellent goods from you, man. I’ve understand your stuff previous to and you are just extremely magnificent. I actually like what you’ve acquired here, certainly like what you’re saying and the way in which you say it. You make it entertaining and you still care for to keep it sensible. I can not wait to read far more from you. This is really a great website.