Breaking News

ENG vs IND Edgbaston Test Day 4: टीम इंडिया इतिहास रचण्याच्या काठावर, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind edgbaston test day 4
Photo Courtesy: X

ENG vs IND Edgbaston Test Day 4 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ समाप्त. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावातही जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडसमोर 607 धावांचे मोठे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात आपले तीन बळी गमावले. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने आणखी एक दीडशतक करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाकडे विजयाची संधी असेल.

ENG vs IND Edgbaston Test Day 4 Highlights

– चौथ्या दिवशी भारताची 1 बाद 64 वरून सुरुवात

– करूण नायर पुन्हा एकदा अपयशी ठरत 26 धावांवर बाद

– केएल राहुल याचे आणखी एक शानदार अर्धशतक

– राहुल 55 धावा करून बाद

– लंचपर्यंत भारत 3 बाद 177

– दुसऱ्या सत्रात भारताची आक्रमक फटकेबाजी

– रिषभ पंतने जोरदार फलंदाजी करत केवळ 58 चेंडू चोपल्या 65 धावा

– गिलचेही अर्धशतक पूर्ण

(Latest Cricket News)

– गिल-पंतची केवळ 103 चेंडूंमध्ये 110 धावांची भागीदारी

– चहापानाच्या काही क्षण आधी गिलने पूर्ण केले आपले आठवे कसोटी शतक

– चहापानापर्यंत भारत 4 बाद 304

– चहापानानंतर घातली सामन्यातील सलग दुसऱ्या अर्धशतकाला गवसणी

– गिलनेही गाठला 150 धावांचा पल्ला

– वैयक्तिक 161 धावांवर गिल बाद

– नितिशकुमार रेड्डी केवळ एक धाव करण्यात यशस्वी

– अखेर 6 बाद 427 धावांवर भारताने घोषित केला दुसरा डाव

– इंग्लंडसमोर 607 धावांचे आव्हान

– इंग्लंडची खराब सुरुवात झॅक क्राऊली खातेही न खोलता बाद

– बेन डकेट आक्रमक 23 धावा करून बाद

– अनुभवी जो रूट 6 धावा करून ठरला आकाश दीपचा दुसरा बळी

– दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड 3 बाद 72

– भारताला विजयासाठी सात बळींची तर इंग्लंडला विजयासाठी 536 धावांची आवश्यकता

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ENG vs IND Edgbaston Test Day 3: ब्रूक-स्मिथच्या त्रिशतकी भागीदारीने सामना रंगला, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स