Breaking News

Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच

BIRMINGHAM TEST
Photo Courtesy: X

England Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. उभय संघांदरम्यान 2 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही. 

England Announced Playing XI For Birmingham Test

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत करणाऱ्या इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा इंग्लंड संघात समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने विजय संघ कायम ठेवला.

बर्मिंगहॅम कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन- झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: भारतीय बॅडमिंटनचा नवा युवराज! Ayush Shetty बनला US Open Badminton 2025 चा विजेता