Breaking News

FC Barcelona चा मोठा निर्णय! मॅनेजर Xaviची केली हकालपट्टी

fc barcelona
Photo Courtesy: X

FC Barcelona Sacked Xavi| जगातील अग्रगण्य व्यावसायिक फुटबॉल क्लब असलेल्या एफसी बार्सिलोना (FC Barcelona) क्लबने आपला मॅनेजर झावी हर्नांडेझ (Xavi) याची हकालपट्टी केली आहे. तो पुढील हंगामात संघाचा भाग नसेल. विशेष म्हणजे, चार आठवड्याआधीच त्याला मुदतवाढ देण्यात आली होती.

झावी हा संघाचा मॅनेजर असताना बार्सिलोना संघाला ला लीगा 2023-2024 मध्ये विजेतेपद जिंकण्यात अपयश आले. ते दुसऱ्या स्थानी राहिले. विजेतेपद जिंकलेल्या रियाल माद्रिद संघाने त्यांच्यावर 9 गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर झावी याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, बार्सिलोनाचे प्रेसिडेंट जोआन लापोर्टा यांनी त्याची मनधरणी केली होती. परंतु, आता त्यांनीच झावी यापुढे संघासोबत नसेल असे जाहीर केले.

झावी हा बार्सिलोना संघासाठी खेळाडू म्हणून देखील अत्यंत दिग्गज दिग्गज राहिला आहे. त्याने संघासाठी 767 सामने खेळताना विविध 25 विजेतेपदे संघाला मिळवून दिली होती. त्यानंतर 2021 पासून तो संघाचा मॅनेजर बनला होता.

झावी याची हकालपट्टी केल्यानंतर आता क्लबला हॅन्सी फ्लिक यांच्या रूपाने नवा मॅनेजर मिळणार आहे. त्यांनी जो कीम लो यांच्यानंतर काही काळ जर्मनीच्या राष्ट्रीय संघाची धुरा वाहिली होती. मात्र, संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यांची गच्छंती केली गेलेली. सध्या ते बायर्न म्युनिक संघाचे मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत.

(FC Barcelona Sacked Xavi As Manager Hansie Flick Take Over)

 

 

3 comments

  1. hello there and thanks to your info – I have certainly picked up something new from proper here. I did then again expertise several technical points the usage of this web site, as I skilled to reload the site lots of instances prior to I may get it to load correctly. I have been pondering if your web hosting is OK? Now not that I’m complaining, however slow loading circumstances instances will often impact your placement in google and could injury your quality ranking if advertising and ***********|advertising|advertising|advertising and *********** with Adwords. Anyway I am including this RSS to my email and could look out for much extra of your respective exciting content. Make sure you update this once more soon..

  2. I have been examinating out some of your posts and i must say pretty clever stuff. I will surely bookmark your website.

  3. Hello there I am so glad I found your blog, I really found you by mistake, while I was searching on Yahoo for something else, Nonetheless I am here now and would just like to say cheers for a remarkable post and a all round exciting blog (I also love the theme/design), I don’t have time to browse it all at the moment but I have book-marked it and also added your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the awesome job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *