![FIR On Indian Cricketers](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/TEAM-INDIA-2011-WC.jpg)
FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला असून, या खेळाडूंविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे.
डब्लूसीएल 2024 अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा 5 गडी राखून पराभव केला. त्यानंतर युवराज सिंग, हरभजन सिंग (Harbhajan Singh), सुरेश रैना (Suresh Raina) व गुरकिरत मान (Gurkeerat Maan) या चार खेळाडूंनी एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ते लंगडताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तौबा तौबा हे गाणे लावण्यात आले. हरभजनने कॅप्शन देत लिहिले, ‘डब्लूसीएल 2024 खेळून शरीर तौबा तौबा झाले’ मात्र याच व्हिडिओमुळे आता हे सर्व खेळाडू वादात सापडले.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
या व्हिडिओवर दिव्यांग समूहाने जोरदार आक्षेप नोंदवला आहे. भारताची पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिने भारतीय खेळाडूंवर टीका केली. तसेच भारतीय पॅरालिंपिक संघटनेने देखील या प्रकरणावर आपला आक्षेप जाहीर केला. दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्पलोयमेंट फॉर डिसेबल पीपल्स (NCPEDP) या संस्थेने नवी दिल्ली येथील अमर कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये या खेळाडूंविरोधात हे एफआयआर नोंदवली आहे. याबरोबरच इंस्टाग्रामची मालक असलेल्या मेटा कंपनी विरोधातही त्यांनी तक्रार दाखल केली.
हा वाद वाढल्यानंतर हरभजन सिंग व सुरेश रैना यांनी जाहीर माफी मागितली आहे. तसेच दिव्यांग लोकांची खिल्ली उडवण्याचा कोणताही हेतू नव्हता. केवळ सलग खेळल्यामुळे शरीराचे असे हाल झाले इतकेच आम्हाला सांगायचे होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सोबतच त्यांनी हा व्हिडिओ देखील हटवला आहे.
(FIR On Indian Cricketers Yuvraj Singh, Harbhajan Singh, Suresh Raina & Gurkeerat Maan)