
French Open 2025 Semi Final: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2025 च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. यावेळी क्रमवारीत पहिला दहामध्ये असलेलेच चार खेळाडू उपांत्य फेरीत भिडतील.
French Open 2025 Semi Final
बुधवारी (4 जून) पुरुष एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अव्वल मानांकित जानिक सिन्नर (Jannik Sinner), द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz), सहावा मानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व आठव्या मानांकित लॉरेन्झो मुसेट्टी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीचा पहिला सामना गतविजेता अल्कारेझ व मुसेट्टी यांच्या दरम्यान होईल. तर, दुसऱ्या सामन्यात जोकोविच व सिन्नर आम्हीसामने येथील. हे दोन्ही सामने शुक्रवारी खेळले जातील. तर, रविवारी अंतिम सामना होईल.
You really can’t make this up pic.twitter.com/RTTvgstRKQ
— 5ga🫦 (@Iga_Nation) June 4, 2025
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात प्रथम मानांकित एरिना सबालेंका व पाचवी मानांकित तसेच गतविजेती इगा स्वियाटेक भिडणार आहेत. दुसरा उपांत्य सामना दुसरी मानांकित कोको गॉफ व बिगर मानांकित लोस बोइसन यांच्या दरम्यान होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी खेळला जाईल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
French Open 2025 Semi Final
French Open 2025: सोप्या विजयासह जोकोविच तिसऱ्या फेरीत