Breaking News

Rohit Virat च्या भविष्याबाबत हेड कोच गंभीरचे मोठे विधान, म्हणाला, “आता ते दोघे…”

rohit sharma, virat kohli
Photo Courtesy: X/BCCI

Rohit Virat Future In Team India: आगामी श्रीलंका दौऱ्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) व निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली.‌ यामध्ये त्यांनी भारतीय क्रिकेटच्या भवितव्याविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व विराट कोहली (Virat Kohli) यांच्या भारतीय क्रिकेटमधील भविष्याविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर दिले.

श्रीलंका दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी भारतीय संघात रोहित व विराट यांना स्थान मिळाले आहे. दोघेही टी20 क्रिकेटमधून निवृत्त झाले असून, आता ते केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसतील. त्यांच्या भवितव्याविषयी विचारले असता गंभीर म्हणाला,

“विराट आणि रोहित दोघेही भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. दोघेही जागतिक दर्जाचे खेळाडू आणि फलंदाज असून, त्यांच्यामध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्यांचा फिटनेस चांगला राहिला तर 2027 वनडे विश्वचषकासाठी (ODI World Cup 2027) देखील त्यांचा विचार होईल.‌”

सध्या भारतीय संघासमोर सर्वात मोठे आव्हान 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे असणार आहे. ही वनडे क्रिकेटमधील दुसरी सर्वात महत्त्वपूर्ण स्पर्धा मानली जाते. असा अंदाज व्यक्त केला जात होता की, रोहित व विराट यांच्यासाठी ही अखेरची मोठी वनडे स्पर्धा ठरू शकते. त्यानंतर जून 2025 मध्ये भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास ती देखील स्पर्धा जिंकण्याची संधी असणार आहे. त्यासाठी या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर संघ व्यवस्थापन व भारतीय चाहत्यांची नजर असेल.

(Gautam Gambhir On Rohit Virat Future)