Breaking News

गौतम गंभीरने निवडली भारताची All Time ODI 11, त्या सहकाऱ्यांना नाहीच दिली संधी, कॅप्टन म्हणून…

All Time ODI 11
Photo Courtesy: X/Star Sports

Gautam Gambhir All Time ODI 11 Of India: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर व विद्यमान भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने भारताच्या सर्वकालीन महान वनडे संघाची (All Time ODI 11) निवड केली आहे. या संघात त्याने अनेक दिग्गज याना समाविष्ट केले आहे. तर, काही महान खेळाडू संघात जागा बनवण्यात अपयशी ठरले.

एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेला मुलाखतीत बोलताना त्याने या संघाची निवड केली. त्याने आपल्या संघात सलामीवीर म्हणून स्वतःसह वीरेंद्र सेहवाग याला स्थान दिले. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची निवड केली. मधला फळीतील फलंदाज म्हणून त्याने सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सध्या क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानला जाणारा विराट कोहली व माजी अष्टपैलू युवराज सिंग यांना संधी दिली आहे. तर, फिनिशर म्हणून त्याने माजी कर्णधार एमएस धोनी याचे नाव घेतले.

गंभीरने या संघात दोन मुख्य फिरकीपटूंना देखील स्थान दिले. यामध्ये दिग्गज अनिल कुंबळे व रविचंद्र अश्विन यांचा समावेश आहे. संघातील दोन वेगवान गोलंदाजांच्या जागी त्याने झहीर खान व इरफान पठाण यांना संधी दिली. त्याने या संघाच्या कर्णधाराचे नाव सांगण्याचे मात्र टाळले.

गंभीरच्या या संघात माजी कर्णधार सौरव गांगुली याचे नाव नाही. तसेच भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा हा देखील त्याच्या संघाचा भाग नाही. यासोबतच भारताला पहिला वनडे विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव हे देखील या संघात जागा बनवू शकले नाहीत. याव्यतिरिक्त फिरकीपटू हरभजन सिंग व विद्यमान संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना देखील त्याने निवडले नाही.

(Gautam Gambhir Picks Indias All Time ODI 11)

हे वाचलंत का?

गडी काय थांबेना! 34 वे कसोटी शतक ठोकत Joe Root बनला इंग्लंड क्रिकेटचा GOAT, विराट-रोहितला…