Breaking News

ICC Awards 2024 Nomination: जस्सीने राखला टीम इंडियाचा मान, आता ‘या’ स्टार्सशी थेट स्पर्धा

ICC AWARDS 2024 NOMINATION
Photo Courtesy: X

ICC Awards 2024 Nomination: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी यांनी आयसीसी पुरस्कार 2024 (ICC Awards 2024) साठी नामांकने जाहीर केली आहेत. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला दोन प्रमुख विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे.

ICC Awards 2024 Nomination

आयसीसीने जाहीर केलेल्या नामांकनांमध्ये बुमराह याला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीसाठी नामांकित केले गेले आहे. या विभागात त्याला इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेड व इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.

यासोबतच बुमराह याला वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटीपटू पुरस्कारासाठी देखील नामांकित करण्यात आले आहे. या विभागात त्याला रूट व ब्रूक यांच्यासोबतच श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस यांचे आव्हान असेल.

जसप्रीत बुमराह याने या वर्षभरात दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने यावर्षी 13 कसोटी सामने खेळताना 26 डावांमध्ये 71 बळी मिळवले. यादरम्यान त्याची सरासरी 14.92 व स्ट्राईक रेट 30.1 इतका राहिला. तर त्याची इकॉनॉमी 2.96 इतकी किरकोळ राहिली. यादरम्यान त्याने पाच वेळा पाच बळी घेण्याचा कारनामा केला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

जसप्रीत बुमराह याने यावर्षी एकही वन ड सामना खेळला नाही. टी20 चे देखील आठ सामने तो विश्वचषकातच खेळला. यामध्ये त्याने 15 बळी मिळवले. भारतीय संघाला विश्वविजेता बनवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला. मागील जवळपास नऊ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या बुमराह याला अद्याप एकदाही आयसीसी पुरस्कार जिंकता आलेला नाही.

(Jasprit Bumrah In ICC Awards 2024 Nomination)

हे देखील वाचा- भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी