Breaking News

Malaysia Open 2025 मधील भारताचे आव्हान संपुष्टात! सात्विक-चिराग सेमीफायनलमध्ये पराभूत

MALAYSIA OPEN
Photo Courtesy: X

Malaysia Open 2025: मलेशिया ओपन 2025 (Malaysia Open 2025) या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकनंतर दोघे पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होते.

Satwik Sairaj And Chirag Shetty Eliminated From Malaysia Open 2025

भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेली ही एकमेव जोडी होती. उपांत्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या सेओ व किम या जोडीशी होता. मात्र, कोरियन जोडीने त्यांचा 21-10, 21-15 असा सहज पराभव केला.

(Satwik Sairaj And Chirag Shetty Eliminated From Malaysia Open 2025)

हे देखील वाचा- Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?