Breaking News

तूच खरा लढवय्या! फ्रॅक्चर असूनही देशासाठी मैदानात उतरला Rishabh Pant, पाहा व्हिडिओ

rishabh pant
Photo Courtesy: X

Fighter Rishabh Pant Coming To Bat In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा दिसून आला. उजव्या पायाला गंभीर दुखापत असताना देखील, केवळ देशासाठी व संघहितासाठी तो फलंदाजीसाठी उतरला. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Limping Rishabh Pant Coming To Bat In Manchester Test

पंत याला सामन्याच्या पहिल्या दिवशी दुखापत झाली होती. रिव्हर्स हिट खेळताना ख्रिस वोक्स याचा चेंडू थेट त्याच्या उजव्या पायाच्या बोटांजवळ लागलेला. त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला. दुसऱ्या दिवशी माध्यमांतील वृत्तांनी पंत सहा आठवडे खेळण्यासाठी उपलब्ध नसेल अशी माहिती दिली होती. मात्र, संघाला गरज असल्यास आपण फलंदाजीसाठी उतरू असे पंतने सांगितलेले.

दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर यांच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसल्यानंतर पंत मैदानात आला. तो पायऱ्या उतरताना व मैदानात येताना लंगडताना दिसत होता. त्याच्या या धैर्यपूर्ण कृतीला मैदानावरील सर्वच चाहत्यांनी उभे राहून अभिवादन केले. त्यानंतर पहिल्या सत्राचा खेळ संपेलपर्यंत त्याने 7 चेंडू खेळून काढत 2 धावा बनवल्या.

पंत याला त्याच्या झुंजार वृत्तीसाठी संपूर्ण क्रिकेट जगतात ओळखले जाते. त्याचा डिसेंबर 2022 मध्ये अपघात झाला होता. यामध्ये त्याच्या गुडघ्याला दुखापत झालेली. त्यावेळी अनेकांनी पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही असे म्हटलेले. मात्र, सव्वा वर्षाच्या काळातच त्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा क्रिकेट मैदानावर पुनरागमन केले. त्यानंतर तो भारताच्या टी20 विश्वचषक व चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग राहिला. तसेच, कसोटी संघाचा उपकर्णधार देखील बनला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Rishabh Pant बद्दल धक्कादायक बातमी, टीम इंडिया संकटात, वाचा सविस्तर