Breaking News

‘कमबॅक मॅन’ Karun Nair ची 200 नंबरी कामगिरी, इंडिया ए ची दुसऱ्या दिवशीच सामन्यावर मजबूत पकड

karun nair
Photo Courtesy: X

Karun Nair Hits Double Century For India A: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा इंग्लंड अ (IND A v ENG A) विरुद्धचा पहिला सामना शुक्रवारी (30 मे) सुरू झाला. या चारदिवसीय सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर करूण नायर (Karun Nair) व सर्फराज खान (Sarfraz Khan) यांनी मोठी भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. यादरम्यान करूण याने आपले शतक साजरे केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर लवकरच करूण याने आपले द्विशतक झळकावले.

Karun Nair Hits Century For India A

यशस्वी जयस्वाल व अभिमन्यू ईस्वरन लवकर बाद झाल्यानंतर करूण व सर्फराज यांनी चिवट फलंदाजी केली. दोघांनी तिसऱ्या गडासाठी 142 धावांची भागीदारी केली. तब्बल आठ वर्षांनी भारतीय संघात जागा मिळालेल्या करूण याने मुख्य संघात प्रवेश करण्याआधी खेळलेल्या आपल्या पहिल्याच सामन्यात सतत पूर्ण केले. तर, सर्फराज हाय 92 धावांवर बाद होऊन कमनशिबी ठरला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने तीन बाद 409 धावा बनवल्या होत्या. तेव्हा करूण नाबाद 184 धावांवर तर ध्रुव जुरेल 82 धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर करूणने आपले द्विशतक पूर्ण करत कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा पार केला.

भारतीय संघाकडून यापूर्वी करूण 2017 मध्ये अखेरच्या वेळी खेळला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली. तरीही पुनरागमनाची संधी त्याला मिळाली नव्हती. दोन वर्षांपूर्वी ‘प्रिय क्रिकेट, मला दुसरी संधी दे’ अशा आशयाचे ट्विट केल्याने तो चर्चेत आलेला. त्यानंतर त्याला आता इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या निवृत्तीमुळे तो संघाच्या अंतिम 11 मध्ये दिसू शकतो.

Karun Nair Hits Double Century For India A

हे देखील वाचा: लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर

तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे