
IPL 2025 Qualifier 2: आयपीएल 2025 (IPL 2025) आता अखेरीकडे आली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवून आरसीबीने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली असून, दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier 2) सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (MIvPBKS) भिडतील. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
IPL 2025 Qualifier 2 MIvPBKS Preview
We're into the endgame now 🏆
Tonight, one journey ends… and one marches to the final frontier ⚔️#TATAIPL | #PBKSvMI | #Qualifier2 | #TheLastMile pic.twitter.com/8ayQ2oFFbF
— IndianPremierLeague (@IPL) June 1, 2025
गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून पंजाबने क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केला होता. मात्र, आरसीबीने त्यांना एकतर्फी हरवत अंतिम सामन्यातील जागा निश्चित केली. दुसरीकडे, मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरातला संघर्षपूर्ण सामन्यात मात दिली.
उभय संघातील हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना थेट अनुभव विरुद्ध युवा जोश असा असणार आहे. मुंबई इंडियन्सकडे तगड्या अनुभवी खेळाडूंची फौज असून, पंजाबने आपल्या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. मुंबईकडे पाच वर्षानंतर तर, पंजाबकडे तब्बल दहा वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, जॉनी बेअरस्टो, ट्रेंट बोल्ट व मिचेल सॅंटनर या सर्व अनुभवी खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला पंजाब कर्णधार श्रेयस अय्यर, मार्कस स्टॉयनिस, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल व जोश इंग्लिस यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यांच्या जोडीला प्रियांश आर्या, प्रभसिमरन, नेहल वढेरा व शशांक सिंग असतील.
अहमदाबाद येथील खेळपट्टी फलंदाजीला पूरक असेल. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता कमी असल्याने 180 ते 200 ही धावसंख्या उभारण्याचा प्रथम फलंदाजी करणारा संघ प्रयत्न करेल. मात्र, पहिल्या डावातील काही षटके चेंडू चांगला स्विंग होऊ शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
संभाव्य प्लेईंग 11-
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, राज अंगद बावा, मिचेल सॅंटनर, रिचर्ड ग्लेसन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट. इम्पॅक्ट प्लेअर- अश्वनीकुमार.
पंजाब किंग्स- प्रभसिमरन, प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर, जोश इंग्लिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, अझमत ओमरझाई, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, झेवीयर बार्टलेट. इम्पॅक्ट प्लेअर- हरप्रीत ब्रार.
(IPL 2025 Qualifier 2 MIvPBKS Preview)
हे देखील वाचा:
तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे
मुंबईने केले गुजरातला IPL 2025 मधून एलिमिनेट! पलटणची क्वालिफायर 2 मध्ये थाटात एंट्री
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।