Breaking News

MPL 2024| सलग दुसऱ्या वर्षी MPL मध्ये चाहत्यांना फ्री एंट्री, अजून काय-काय स्पेशल, वाचा लगेच

MPL 2024
Photo Courtesy” X/MPL

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारीपासून (2 जून) सुरू होत आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) यांच्या दरम्यान होईल. विशेष म्हणजे एमसीएने यावर्षी देखील या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला आहे.

मागील वर्षी प्रथमच झालेल्या या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. सहा संघांच्या या स्पर्धेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सहभागी झाले होते. यंदा देखील केदार व ऋतुराज खेळताना दिसतील. स्पर्धेत यावर्षी देखील रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets), पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers), रायगड रॉयल्स (Raigad Royals), ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans), पुणेरी बाप्पा (Puneri Bappa) व छत्रपती संभाजी किंग्स (Chhatrapati Sambhaji Kings) हे संघ खेळताना दिसतील.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला यंदा बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय हिचे खास आकर्षण असेल. तसेच गुलाबी साडी फेम गायक संजू राठोड हा देखील या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून हा उद्घाटन सोहळा सुरू होईल. तर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा व स्पोर्ट 18 या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होईल.

(MPL 2024 All About Opening Ceremony And First Match At MCA)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *