Indian Shooters In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या सदरातील पुढील दावेदार आहे भारताचे नेमबाज (Indian Shooters)
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Indian Shooters)
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे एकूण 117 ऍथलिट सहभागी होत आहेत. यंदा भारतीय पथकाने दहापेक्षा जास्त मेडल आणण्याचे लक्ष ठेवले असून, खेळाडूंनी तयारी देखील तशी केली आहे. भारतीय पथकाला हे टार्गेट पूर्ण करायचे असल्यास, ज्या खेळातून सर्वाधिक हातभार लागू शकतो तो खेळ म्हणजे नेमबाजी. कारण, स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताकडून तब्बल 21 नेमबाज जगातील या खेळांच्या कुंभमेळ्यात उतरतील. त्यातील मेडलच्या तीन सर्वात प्रबळ दावेदारांविषयी आपण जाणून घेऊया.
✅ 21 shooters
✅ 15 eventsThe Indian Shooting Squad will be motivated to have their eyes on GOLD at the Paris Olympics after a disheartening show in Tokyo and Rio!🇮🇳
How many shooting medals will India win at the games?🤔#Shooting #Paris2024 #Olympics pic.twitter.com/TMA6w2mW4c
— Sports Club (@itsport_clubs) July 26, 2024
1) सिफत कौर समरा (Sift Kaur Sarma) – ऑलिंपिक्समध्ये भारताच्या ज्या नेमबाजकडून सर्वाधिक अपेक्षा केली जात आहे ती म्हणजे सिफत कौर समरा. सिफत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात आपले आव्हान सादर करणार आहे. पंजाबच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली सिफत एमबीबीएस करून डॉक्टर होण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, लहानपणी भावाने शूटिंगशी करून दिलेली ओळख तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर तिने एमबीबीएस सोडून पूर्णवेळ शूटिंग करण्याचा निर्णय घेतला.
पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| युवा Lakshya Sen च्या रॅकेटमधून येणार ‘गोल्डन स्मॅश?
सिफतने हॅंगझू एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. ती सहभागी होत असलेल्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सध्या तिच्या नावे विश्वविक्रम आहे. याच कारणाने सिफत पदकाची सर्वात मोठी दावेदार मानली जातेय.
2) अनिश भानवाला (Anish Bhanwala)- सिफतप्रमाणेच अगदी कमी वयात ज्याच्यावर सर्वांची नजर आहे तो म्हणजे पिस्टल शूटर अनिश भानवाला. एकवेळ पाच खेळात पारंगत असलेल्या अनिश याने पुढे जाऊन फक्त शूटिंगवर लक्ष केंद्रित केले. 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये केवळ पंधरा वर्षांचा असताना त्याने 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात देशाला सुवर्णपदक जिंकून दिलेले. केवळ चार सेकंदात पाच राऊंड फायर करायच्या या सर्वात कठीण इव्हेंटमध्ये तो आपले सर्वस्व झोकून देईल.
3) मनू भाकेर (Manu Bhaker) – केवळ 22 वर्षांची असलेली तरी देखील, पाठीशी अफाट अनुभव असलेली मनू भाकेर ही कशी कामगिरी करते यावर भारतीय नेमबाजांचे यश अवलंबून असणार आहे. मनू टोकियो ऑलिंपिक्समध्ये पटकावेल असे अनेकांना वाटलेले. मात्र, तीन प्रकारात सहभागी होऊन देखील दबावामुळे ती अपेक्षित कामगिरी करू शकली नव्हती.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
पॅरिसमध्ये चित्र वेगळे दिसेल. यावेळी देखील तीन प्रकारात आपले नशीब आजमावणार आहे. सुरुवातीला 10 मीटर एयर पिस्टल त्यानंतर 25 मीटर एअर पिस्टल व अखेरीस सरबजोत सिंग याच्यासोबत 10 मीटर एयर पिस्टल मिश्र प्रकारात ती आव्हान सादर करेल. आपल्या छोट्याशा कारकिर्दीत तिने सर्व स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल जिंकली आहेत. त्याला अपवाद फक्त ऑलिंपिक मेडल आहे. पॅरिसमध्ये ती देखील कमी पूर्ण करण्याचा तिचा निर्धार असेल.
भारताचे तब्बल 21 नेमबाज पंधरा विविध प्रकारात नेम लावणार आहेत. यामध्ये कमीत कमी तीन पदके तरी भारताच्या खात्यात येतील अशी अपेक्षा सर्वांना आहे. लंडन ऑलिंपिकपासून पडलेला नेमबाजीतील पदकाचा दुष्काळ ही यंग ब्रिगेड संपवेल यात शंका नाही.
(Indias 15 Medal Hopes In Paris Olympics Indian Shooters Anish Bhanwala Sift Kaur Samra And Manu Bhaker)
अधिकचे वाचा-
Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| फायटर लवलिना पॅरिसमध्ये लगावणार गोल्डन पंच?
पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| ‘देश की बेटी’ Vinesh Phogat यंदा देणार धोबीपछाड
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।